महत्वाच्या बातम्या

 अमरनाथ यात्रा मार्गावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे ठेवणार २४ तास लक्ष :  सीआरपीएफची १३७ वी बटालियन तैनात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था /जम्मू कश्मीर : केंद्रीय राखीव पोलीस दलाने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रिमोट कंट्रोल्ड जॅमरसह उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे असलेले अत्याधुनिक ड्रोन तैनात केले आहेत. त्याद्वारे अमरनाथ यात्रा मार्गावरील सुरक्षा स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

यात्रेकरूंच्या रक्षणासाठी सीआरपीएफची १३७ वी बटालियन तैनात करण्यात आली असून अत्यंत समर्पित भावनेने ही बटालियन या यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी घेईल, असे या दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केवळ ड्रोनच नव्हे तर अत्यंत आधुनिक संपर्क व परिवहन यंत्रणाही या दलातर्फे येथे तैनात केली जात आहे. यात्रा मार्गावर त्याद्वारे सतत २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.

१ जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा मध्य काश्‍मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील पहलगाम आणि बालतालमधील नुनवान या पारंपारीक मार्गांवरून सुरू होईल.





  Print






News - World




Related Photos